प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर
प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर
img
वैष्णवी सांगळे
रस्ता अपघातांच्या घटनांना काही ब्रेक लागताना दिसत नाहीय. नंदुरबार मध्ये रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. नंदुरबारहुन शहादाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी टॅक्सी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक दिल्याची घटना घडलीय. या अपघातात टॅक्सीचा अक्षरश: चक्काचूर झालाय. 

शहादा तालुक्यातील लांबोळा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.ट्रक आणि टॅक्सीची धडक इतकी भीषण होती की टॅक्सीचे मोठे नुकसान झाले आहे.

तर अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र यातील वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group