BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नीचे गंभीर आरोप
BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नीचे गंभीर आरोप
img
वैष्णवी सांगळे
दिल्लीतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत रविवारी रात्री उशिरा घडलेल्या भीषण अपघातात वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे ५७ वर्षीय उपसचिव नवज्योत सिंह यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बीएमडब्ल्यू चालवणाऱ्या गगनप्रीत कौरला पोलिसांनी आज अटक केली. 

नवज्योत सिंह यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संदीप कौर होत्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, संदीप कौर यांनी गगनप्रीत कौरवर गंभीर आरोप केले आहेत.

मोठी बातमी ! 'धोत्रे' खुनातील फरार असलेले माजी नगरसेवक उद्धव निमसे पोलिसांच्या ताब्यात

संदीप कौर यांनी पोलिसांना सांगितले की, अपघातानंतर नवज्योत यांचा श्वास सुरू होता. त्यांनी गगनप्रीतला जवळच्या रुग्णालयात नेण्याची वारंवार विनंती केली. मात्र गगनप्रीतने १९ किलोमीटर दूर असलेल्या न्यूलाईफ हॉस्पिटल मध्ये नेले. तपासात समोर आले आहे की गगनप्रीतच्या वडिलांचा या रुग्णालयाशी संबंध आहे.

पाचोऱ्यात ढगफुटी, निम्म गाव झालं जलमय ; परतीच्या पावसाने राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गगनप्रीतने अपघातग्रस्तांना न्यूलाईफ हॉस्पिटलमध्ये नेले, जेणेकरून मेडिकल रिपोर्ट्समध्ये फेरफार करता येईल. सध्या नवनीत कौरवर हत्या आणि अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group