१० नोव्हेंबरला दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील सायंकाळ रोजसारखी नव्हती. त्यादिवशी रस्त्यावर होता आक्रोश, किंचाळ्या, रक्त आणि भीती. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला. या स्फोटाने फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरला. यात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले.
मागील काही दिवसांपासून या बॉम्बस्फोटाचा कट रचला जात होता. धक्कादायक म्हणजे जैशकडून या स्फोटासाठी पैसा पुरवण्यात आला होता. मुख्य म्हणजे हा स्फोट दिल्लीत नाहीतर तर गर्दीच्या धार्मिक ठिकाणी म्हणजे अयोध्या, वाराणसी येथे घडवायचा होता. मात्र, घाईघाईत हा स्फोट दिल्ली येथे झाला.
लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने ज्या कारमध्ये स्फोट झाला i-20 च्या कार मालकाला अटक केली. हाच या हल्ल्याचा खरा सूत्रधार असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली.बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली i-20 ही कार काश्मीरचा रहिवाली डॉ. उमर नबी याची आहे.
एनआयएच्या तपासानुसार, नबी हा कारच्या व्यवहारासाठी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत आला होता. डॉ. उमर उन नबी हा पंपोर जिल्ह्यातील संबूरा येथील रहिवासी आहे. त्याने हा संपूर्ण कट रचला होता. हैराण करणारे म्हणजे तो देखील डॉक्टर आहे. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, त्यावेळी ही i-20 कार दिल्लीत तब्बल ११ तासापासून फिरत होती. मोठी स्फोटके या कारमध्ये होती.