धक्कादायक ! 'या' कारणातून हुमा कुरेशीच्या भावाची हत्या
धक्कादायक ! 'या' कारणातून हुमा कुरेशीच्या भावाची हत्या
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी यांची स्कूटी पार्किंगच्या छोट्याशा वादातून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री ११ वाजता दिल्लीतील निजामुद्दीनमधील जंगपुरा भोगल लेनमध्ये ही घटना घडली. पार्किंगच्या वादातून आसिफची हत्या झाली, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

BSNL ची भन्नाट ऑफर ! फक्त 1 रुपयांत 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन बरंच काही...

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री आसिफ कुरेशी आणि काही लोकांमध्ये पार्किंगवरून भांडण झाले होते. आसिफने आरोपींना घराच्या गेटबाहेर स्कूटर पार्क करू नका असे सांगितले होते, परंतु त्यांनी ऐकले नाही. या वादातून एका आरोपीने आसिफवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात आसिफच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि दोन आरोपींना अटक केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group