BSNL ची भन्नाट ऑफर ! फक्त 1 रुपयांत  2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन बरंच काही...
BSNL ची भन्नाट ऑफर ! फक्त 1 रुपयांत 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन बरंच काही...
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही वर्षांपासून BSNL ने आपले जाळे आणि सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत BSNL काही प्रमाणात मागे पडली होती, मात्र आता कंपनी पुन्हा एकदा बाजारात जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठीआकर्षक ऑफर आणली असून, त्यातून देशभरातील नवे ग्राहक जोडण्याचा त्यांचा मानस आहे. 'BSNL is back!' असं सांगत कंपनीने '₹1 Freedom Offer'ची घोषणा केली आहे. 

BSNL ने ही माहिती आपल्या अधिकृत X  हँडलवरून दिली आहे. BSNL च्या ऑफरनुसार, नवीन ग्राहकांना फक्त १ रुपयात अनेक सेवा मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला मोफत सिमकार्ड तर मिळेलच, पण त्यासोबतच 30 दिवसांसाठी अनेक सेवाही मोफत वापरता येतील. या ऑफरमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल्स आणि 100 SMS मोफत मिळणार आहेत. या सर्व सेवा 30 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असतील.

धक्कादायक ! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रेयसी मंदिरात जाताच 'तो' तिथे पोहोचला अन...

अटी आणि शर्ती 
ही '₹1 Freedom Offer' फक्त नवीन ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे. जुन्या किंवा सध्याच्या BSNL ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. तसेच, ही ऑफर 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वैध असणार आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group