सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सध्या आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमुळे चर्चेचा विषय बनली आहे. बीएसएनएलचे रिचार्ज प्लान इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. यामुळेच अनेक जण आपले नंबर बीएसएनएलला पोर्टही करत आहेत. इतकंच नाही तर बीएसएनएल आपल्या इतर क्षेत्रातही खूप वेगानं काम करत आहे. बीएसएनएल लवकरच देशभरात ४जी सेवा सुरू करणार आहे.
नवीन वर्षाच्या निमित्तानं बीएसएनएलनं आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत.
बीएसएनएलचा २१५ रुपयांचा प्रीपेड प्लान बीएसएनएलचा नवा २१५ रुपयांचा प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. ३० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्संना दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळणार आहे. तसेच दररोज १०० फ्री एसएमएसचा ही लाभ मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही या प्लानमध्ये समाविष्ट आहे.
बीएसएनएलचा ६२८ रुपयांचा प्रीपेड प्लान बीएसएनएलचा नवा ६२८ रुपयांचा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सना दररोज ३ जीबी डेटाचा फायदा मिळणार आहे. तसंच दररोज १०० फ्री एसएमएसचाही लाभ मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही या प्लानमध्ये समाविष्ट आहे.
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युजर्सला फ्री हार्डी गेम्स, चॅलेंजर्स एरिना गेम्स, गेमऑन, अॅस्ट्रोसेल, लिस्टन पॉडकास्ट, जिंग म्युझिक, वा एंटरटेनमेंट आणि बीएसएनएल ट्यून्स अशा अनेक कॉम्प्लिमेंटरी व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस मिळतील.