मोठी बातमी ! राजधानी दिल्ली पुन्हा टार्गेटवर, घातपाताचा मोठा कट पोलिसांनी उधळला
मोठी बातमी ! राजधानी दिल्ली पुन्हा टार्गेटवर, घातपाताचा मोठा कट पोलिसांनी उधळला
img
वैष्णवी सांगळे
नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाचा धमाका अजूनही कित्येकांच्या मनात ताजा आहे, त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. मात्र आता राजधानी दिल्लीला पुन्हा टार्गेट करण्यात येणार होतं अशी माहिती समोर आली आहे. टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा कट उधळण्यात आला आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार समजल्या जाणाऱ्या ‘बडा इम्रान’ला ओडिशातून गजाआड करण्यात आलंय. 

गुप्त माहितीच्या आधारे, दोन्ही यंत्रणांनी मुंबईत छापे टाकून दोन संशयितांना अटक केली. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आले आहे. ​तपासादरम्यान सुरक्षा यंत्रणांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी ‘आयसिस’च्या (ISIS) ऑनलाइन प्रचाराने प्रभावित झाले होतं असं समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये एक खेळण्यातील रेल्वेगाडी, वायर, सर्किट्स आणि इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश आहे. आरोपी या खेळण्यातील रेल्वेचा वापर करून ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’ (IED) नेण्यासाठी किंवा त्याचा स्फोटक वाहन म्हणून वापर करण्याच्या प्रयत्नात होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हे दोघे टॉय कार बॉम्ब'द्वारे  दिल्लीत हल्ल्या करण्याच्या तयारीत होते. 

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे मोसाब अहमद उर्फ ​​कलाम कल्याण आणि मोहम्मद हमद कोल्लारा अशी असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. प्राथमिक तपासात असं समोर आलंय की, ते काही काळापासून कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित होते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आले होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group