मोठी बातमी : दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आतिशी
मोठी बातमी : दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आतिशी
img
DB
दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर राजीनाम्यानंतर आता दिल्लीत आतिशी यांचं सरकार स्थापन झालं आहे. आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी आज राज निवास येथे त्यांना मुख्यमंत्री पदाच्या गोपनीयतेची शपथ दिली. आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या सर्वात जवळच्या नेत्या मानल्या जातात, ज्यांना निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांनी आत्मविश्वासाने मुख्यमंत्रिपद दिले आहे. आतिशी यांच्या मंत्रिमंडळात 5 मंत्र्यांचा समावेश आहे. ज्यांनी आतिशी यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी आतिशी यांनी प्रस्तावित मंत्र्यांसह अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या घरी भेट घेतली. बैठकीनंतर आतिशी आणि इतर मंत्री पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘राज निवास’कडे रवाना झाले. आतिशी यांनी आज राजनिवास येथे इतर मंत्र्यांसोबत शपथ घेतली.
 
delhi | AAP | atishi |
इतर बातम्या
Join Whatsapp Group