नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १५ मेपर्यंत वाढ केली आहे.
दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात आता पुढील सुनावणी १५ मे रोजी होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबतची सुनावणी 15 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगशी संबंधित ईडी प्रकरणात सिसोदिया आधीच 8 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.
ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणा दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सिसोदिया यांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती.