दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू झालाय. एनआयएमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम, पोलिस अधीक्षकांची टीम आणि आणखी एक पोलिसांची टीम तयार करण्यात आली आहे.
तपास यंत्रणांकडून करण्यात आलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. जैश-ए-मोहम्मदच्या एका नव्या मॉड्यूलचे काम दहशतवादी करत होते. फक्त दिल्लीच नाही तर देशभरातील अनेक शहरांमध्ये मालिका स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्लान होता. ८ दहशतवाद्यांनी चार प्रमुख शहरांना लक्ष्य केले होते. दोन-दोन ग्रूपमध्ये चार शहरांमध्ये घुसून आयईडी स्फोट करण्याचा कट या दशतवाद्यांचा होता.
रिपोर्टनुसार, डॉ. मुजम्मिल, डॉ. आदिल, उमर आमि शाहीन यांनी एकत्रित येत जवळपास २० लाख रुपये जमा केले होते. जे दिल्ली स्फोटापूर्वी उमरला देण्यात आले होते. इथूनच याप्रकरणात ट्विस्ट आला. उमर आणि डॉ. मुजम्मिल यांच्यामध्ये पैशावरून भांडण झाले. उमरने सिग्नल अॅपवर २- ४ मेंबर्सचा सिक्रेट ग्रुप बनवला.
ऐवढेच नाही तर या दहशतवाद्यांनी गुरूग्राम, नूह आणि आसपासच्या परिसरात २० क्विंटलपेक्षा जास्त एनपीके फर्टिलाइजर खरेदी केला होता. ज्याची किंमत ३ लाखांच्या आसपास होती.दिल्ली स्फोटाच्या तपासातून ही माहिती समोर आली की, दिल्लीची i20 आणि इकस्पोर्ट्स सारख्या जुन्या कारनंतर हे दहशतवादी दोन आणखी कार तयार करत होते.
जेणे करून या गाड्यांच्या आतमध्ये स्फोटकं भरून स्फोट करू शकतील. स्फोटांसाठी वेगळी वाहनं तयार केली जात होती का? याचा तपास आता तपास यंत्रणा करत आहेत. या प्रकरणाच्या तपासातून अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.