दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता दिल्ली एनसीआर भागातील लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक भीतीने घराबाहेर पडले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचा हिंदुकुश पर्वत असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता 6.2 रजिस्टर स्केल एवढी आहे.
यामुळे दिल्ली-एनसीआर तसेच जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय पीर पंजाल प्रदेशाच्या दक्षिण भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.
गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली व एनसीआर परिसरात अनेकदा भूकंपाची नोंद झाली आहे. आज दुपारच्या सुमारास येथे भूकंपाचे धक्के जाणवले. धक्के जाणवताच लोक घरातून बाहेर आले. सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही