दिल्ली स्फोट प्रकरण : दहशतवादी उमरचा खळबळजनक व्हिडीओ समोर
दिल्ली स्फोट प्रकरण : दहशतवादी उमरचा खळबळजनक व्हिडीओ समोर
img
वैष्णवी सांगळे
देशाची राजधानी दिल्लीत गेल्या सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भयानक स्फोट झाला, त्यात १२ ठार तर अनेक जण जखमी झाले. दिल्लीतील आत्मघातकी स्फोटात उमरचा मृत्यू झाला, या दहशतवादी कटात सामील होता. तो जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले. तो व्यवसायाने डॉक्टर होता पण तो गुप्तपणे आणि सक्रियपणे जैश-ए-मोहम्मदच्या एका मॉड्यूलमध्ये सहभागी होता. 

दहशतवादी डॉ. उमर याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीमुळे संपूर्ण केसला आणखी गंभीर वळण मिळालं आहे. कारण त्या व्हिडीओत उमर हा थेट सुसाईड बॉम्बिंगचे (आत्मघाती स्फोट) समर्थन करताना दिसत आहे.

या व्हिडीओत तो म्हणतो, ” सर्वात मोठी गैरसमजूत म्हणजे, सुसाईड बॉम्बिग किवा आत्मघाती स्फोट, लोकांना ते समजत नाही. ते कोणत्याही प्रकारे लोकशाहीवादी नाही आणि कोणत्याही सुसंस्कृत समाजात ते स्वीकारार्ह नाही. त्या विरोधात अनेक विरोधाभास आणि अनेक तर्क आहेत.”

पुढे उमर म्हणाला, ” आत्मघाती हल्ल्यातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे , जेव्हा एखादी व्यक्ती असं मानतो की तो एखाद्या निश्चित स्थानी आणि निश्चित वेळी मरणार आहे, तेव्हा तो एका खतरनाक मानसिकतेत असतो. मृत्यू हीच आपली एकमेव मंजिल, एकमेव गंतव्य स्थान आहे, असं तो मानू लागतो. ”

पण खरं सांगायचं तर वास्तव हे आहे की अशी विचारसरणी किंवा अशी परिस्थिती कोणत्याही लोकशाही आणि मानवीय व्यवस्थेत स्वीकारली जाऊ शकत नाही, कारण ती जीवन, समाज आणि कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे.” त्याच्या या रेकॉर्डेड संवादाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
Delhi |
इतर बातम्या
Join Whatsapp Group