सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान सोमवारी धक्कादायक प्रकार घडला. एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याने मोठा गोंधळ उडाला. संबंधित वकिलाला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ‘सनातन धर्म का अपमान नही सहेगा हिंदूस्तान’ अशा घोषणा या वकिलाने दिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं नाव राकेश किशोर असे आहे.

सोमवारी सकाळी सुप्रीम कोर्टाचे कामकाज सुरू झाले होते. खजुराहो येथील भगवान विष्णूच्या खराब झालेल्या मूर्तीशी संबंधित एका जुन्या प्रकरणात CJI यांनी केलेल्या टिप्पणीमुळे राकेश किशोर संतापले होते. गवई यांच्या त्या टिप्पणीचा अनेक हिंदूवादी संघटनांनी विरोध केलाय. सुनावणीवेळी युक्तीवाद सुरू होता,त्यावेळी राकेश किशोर हा वकील पुढे केला अन् पायातील बूट काढून गवईंकडे फेकण्याचा प्रयत्न केला.
वेळीच सुरक्षा रक्षकाने त्याला ताब्यात घेतलं. कोर्टाच्या बाहेर काढलं. कोर्टाबाहेर जाताना तो सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणा देत होता. हा सर्व प्रकार सुरू होता त्यावेळी CJI गवई शांत होते. ते म्हणाले की, अशा घटानामुळे आम्ही विचलीत होणार नाही. तुम्ही तुमचा युक्तीवाद सुरूच ठेवा..
भगवान विष्णूवर काय म्हणाले CJI गवई ?
खजुराहो येथील विटंबना झालेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीचे पुनर्स्थापन करण्याच्या एका व्यक्तीच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश गवई यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, “जा आणि देवालाच काहीतरी करण्यास सांग, तू म्हणतोस की तू भगवान विष्णूचा कट्टर भक्त आहेस. तर जा आणि आता प्रार्थना कर. हे एक पुरातत्व स्थळ आहे आणि ASI ला परवानगी देण्याची गरज आहे. माफ करा.”
घटनेनंतर एका वकिलाने मीडियाशी बोलताना सांगितले की, आजची घटना खूपच दुर्दैवी आहे. कोर्टात एका वकिलाने जर असा प्रकार केला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. आमच्या बारचे ते सदस्य आहेत. आम्ही चौकशी केली असता ते २०११ पासूनचे सदस्य आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी