मोठी बातमी ! मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, अरविंद केजरीवाल यांची घोषणा
मोठी बातमी ! मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, अरविंद केजरीवाल यांची घोषणा
img
दैनिक भ्रमर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची काही दिवसांपूर्वीच  जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला. उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने हा काही अटी शर्थींसह केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसांत आपण जनतेशी संवाद साधून राजीनामा देणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आपण दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हंटले. जो पर्यंत जनता त्यांचा निर्णय देत नाही, तो पर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही असे म्हटले आहे. केजरीवाल म्हणाले, 'मी प्रत्येक घर आणि गल्लीबोळ्यात जाईन. जोपर्यंत जनतेचा निर्णय मिळत नाही तो पर्यंत मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसणार नाही'. 

ते पूढे म्हणाले की , काही लोक म्हणतात की सुप्रीम कोर्टने लावलेल्या निर्बंधांमुळे मी काम करू शकत नाही. त्यांनीही आमच्यावर निर्बंध लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी प्रामाणिक आहे, तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. निवडून आल्यानंतरच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत, पण महाराष्ट्राच्या निवडणुकांबरोबरच नोव्हेंबरमध्ये इथेही निवडणुका घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे. निवडणुका होईपर्यंत पक्षातील दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. येत्या दोन-तीन दिवसांत आमदारांची बैठक होणार असून, त्यात पुढील मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल".


इतर बातम्या
Join Whatsapp Group