ऐन अधिवेशनात अंबादास दानवे यांचा कॅश बॉम्ब
ऐन अधिवेशनात अंबादास दानवे यांचा कॅश बॉम्ब
img
दैनिक भ्रमर

नागपूर (भ्रमर वृत्तसेवा) :- ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडला आहे. 

पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहे? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळे ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? मी याबाबत तक्रार करणार आहे. मी यात कोणाचे नाव घेत नाही पण पोलिसांनी हे शोधले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group