मोठी बातमी!
मोठी बातमी! "त्या" प्रकरणात धनंजय मुंडेंना न्यायालयाचा मोठा दिलासा
img
Dipali Ghadwaje
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांना दिलासा देणारी बातमी आहे. मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले.

या निर्णयाला विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच एक लाख रुपये दंड ठोठावला. न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात आरोपांची राळ उठवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन चुकीचे आरोप करण्यात आले होते.

मात्र धनंजय मुंडे यांनी राज्य मंत्रिमंडळाची रीतसर मान्यता घेऊनच शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धोरणात्मक निर्णय घेऊन सदर प्रक्रिया राबवली, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नेमकं प्रकरण काय होतं?

राज्य शासनाने 12 मार्च 2024 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, बॅटरीवर चालणारे स्प्रेयर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, मेटाल्डिहाईड कीटकनाशक व कापूस साठवणीसाठी बॅग्स यांसारख्या पाच वस्तू थेट खरेदी करून महाराष्ट्र अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन  व महाराष्ट्र स्टेट पॉवरलूम कॉर्पोरेशन  यांच्यामार्फत पुरवण्याचे नियोजन करण्यात आले होते. या निर्णयावरून धनंजय मुंडे यांच्या नावाने घोटाळा हा शब्द वापरून अनेकांनी मुंडेंची व कृषी विभागाची बदनामी केली होती.

या निर्णयाला विरोध करताना Agri Sprayers TIM Association व उमेश भोळे यांच्यासह तीन शेतकऱ्यांनी स्वतंत्र याचिका व जनहित याचिका दाखल करून या वस्तूंना थेट लाभ हस्तांतरण योजनेतून वगळण्यास विरोध दर्शवला होता.

 दरम्यान शेतकरी वर्गास उत्पन्न वाढीच्या दृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा विचार करून शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देणारा धोरणात्मक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याच्या विरोधात अनेकांनी माझ्यावर आरोप करून माझी बदनामी केली.

मात्र आज न्यायदेवतेने सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला. आपला तो निर्णय योग्यच होता, असे म्हणत सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group