राजकीय : महाराष्ट्र सरकारमध्ये खांदेपालट? वाचाळ मंत्र्यांवर कारवाई होणार
राजकीय : महाराष्ट्र सरकारमध्ये खांदेपालट? वाचाळ मंत्र्यांवर कारवाई होणार
img
Dipali Ghadwaje
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकार अडचणीत येताना दिसत आहे. या वाचाळवीर मंत्र्यांमुळे विरोधक सरकारवर निशाणा साधत आहे. या मंत्र्यांवर कारवाई करावी तसंच त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे. या वाचाळवीर मंत्र्यांमुळे सरकार कुठे तरी अडचणीत येत आहे. त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 

दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्र्यांचं खांदेपालट होण्याची शक्यता आहे. वाचाळ मंत्र्यांमुळे अडचणीत आलेल्या सरकारचा जनतेच्या रोषातून बाहेर पडण्यासाठी हा नवा फॉर्म्युला असल्याची माहिती आता समोर  आली आहे.

वाचाळ मंत्र्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्या त्या पक्षाच्या नेत्यांची असणार आहे. युती सरकारमध्ये कारवाई करण्याचे अधिकार पक्षाच्या प्रमुखांकडेच आहेत.

वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत सरकारमधील मोठ्या नेत्यांचे खासगीत बोलतानाचे हे विधान आहे.

युती सरकारमध्ये काम करताना कारवाईचे अधिकार पक्षाच्या प्रमुखांकडेच आहेत. थेट राजीनाम्याच्या ऐवजी खांदेपालट करून जनतेचा रोष कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे पक्षाचे प्रमुख नेते वाचाळ मंत्र्यांवर काय कारवाई करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकार अडचणीत येताना दिसत आहे. या वाचाळवीर मंत्र्यांमुळे विरोधक सरकारवर निशाणा साधत आहे. या मंत्र्यांवर कारवाई करावी तसंच त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे. या वाचाळवीर मंत्र्यांमुळे सरकार कुठे तरी अडचणीत येत आहे. त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

जर पक्षातील कोणताही मंत्री असे वक्तव्य करत असेल तर त्यांच्याविरोधात थेट कारवाई करण्याचा अधिकार पक्षाच्या प्रमुखांना आहे.

भाजपमधील मंत्र्यांवर कारवाईचे अधिकार पक्षाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस, शिवसेनेत कारवाईचे अधिकार एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीमध्ये कारवाई करण्याचे अधकार अजित पवार यांच्याकडे आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group