भगूर परिषदेच्या नगराध्यक्षपदी
भगूर परिषदेच्या नगराध्यक्षपदी
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- भगूर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना उबाठा, भाजपा हे सर्व पक्ष शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात लढले होते. 

या अटीतटीच्या लढतीत अजित पवार गटाने बाजी मारली असून नगराध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे निवडून आल्या आहे. 
भगूर नगर परिषदेमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून विजय करंजकर यांची एक हाती सत्ता होती. अनिता करंजकर यांचा पराभव करत  प्रेरणा बलकवडे या 1913 मतांनी विजयी झाल्या.

त्यांच्या बालेकिल्ल्याला बलकवडे यांनी सुरुंग लावला. प्रेरणा बलकवडे यांना ५४०७ मते मिळाली. मतमोजणी सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात हा निकाल लागला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group