मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत प्रक्रिया पार पडली. नाशिक आणि मालेगाव महापालिकेत खुल्या प्रवर्गाचा महापौर असणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत एसटी प्रवर्गासाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, जालना (महिला) आणि लातूर (महिला) महापालिकेत अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाले आहे. तसेच पनवेल, इचलकरंजी, अहिल्यानगर (महिला) चंद्रपूर (महिला) जळगाव (महिला) कोल्हापूर, अकोला (महिला) आणि उल्हासनगरमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौरपद असणार आहे.
बृहन्मुंबई (BMC) - सर्वसाधारण, ठाणे - अनुसूचित जाती (एससी), कल्याण-डोंबिवली - अनुसूचित जमाती- एसटी (पुरुष), नवी मुंबई- सर्वसाधारण, वसई-विरार - सर्वसाधारण, भिवंडी-निजामपूर - सर्वसाधारण, मीरा-भाईंदर - सर्वसाधारण, पुणे - सर्वसाधारण