नाशिक : विकास प्राधिकरणाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू - जलज शर्मा
नाशिक : विकास प्राधिकरणाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू - जलज शर्मा
img
दैनिक भ्रमर
नाशिक - नासिक विकास प्राधिकरणाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम चालू असून हे काम पुढील वर्षी संपेल आणि त्यानंतर परिसराच्या विकासाबाबत पुढील पावला उचलण्यात येतील अशी माहिती नाशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

 वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिएशनच्या (विसा) च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन  नासिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे महानगर आयुक्त जलज शर्मा यांच्या हस्ते झाले त्यावेळी  तेजस् चव्हाण,डॉ.सचिन हारक, विसाचे अश्विन पंडित, दिनेश शुक्ल, श्रेयस यंदा, शंतनु मत्से,प्रा.श्रीकृष्ण कुलकर्णी,प्रणव साक्रीकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नाशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले की, नाशिक विकास प्राधिकरणाच्या वतीने प्राधिकरण क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हे अजून काही दिवसांमध्ये सुरू होईल त्यापूर्वी या क्षेत्राचं ड्रोण सर्वेक्षण व इतर प्राथमिक माहिती गोळा करण्यात येत आहे संपूर्ण विकास आराखडा हा पुढील वर्षी पूर्ण होईल आणि त्यानंतर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये विविध विकास कामांना गती येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली. 

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की नाशिक विकास प्राधिकरण सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्याने कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे संपादन करत नाही ही सर्व भूसंपादनाची प्रक्रिया आणि बाकीचे विकासकामे ही जिल्हाधिकारी कुंभमेळा प्राधिकरण यांच्यामार्फत सुरू आहेत याबाबत नुकत्याच काही बैठकांमध्ये शेतकऱ्यांनी नाशिक विकास प्राधिकरणाच्या संदर्भामध्ये विविध ठिकाणी चर्चा करताना नाव घेतले होते त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी विकास प्राधिकरणाच्या संदर्भात ही माहिती लक्षात घ्यावी असेही ते म्हणाले
इतर बातम्या
Join Whatsapp Group