नाशिक : वणीत अल्पवयीन मुलगी लव्ह जिहादची शिकार, माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर....
नाशिक : वणीत अल्पवयीन मुलगी लव्ह जिहादची शिकार, माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर....
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दिंडोरी तालुक्यातील वणी येथे एक अल्पवयीन हिंदु मुलगी लव्ह जिहादची शिकार झाली आहे. मागील चार वर्षांपासून एक मुस्लिम युवक तिला मानसिक त्रास देत होता. अखेर या कुटुंबाने वणी येथुन नाशिकला स्थलांतर केले तरी सुध्दा या मुलाचा व त्याच्या कुटुंबाचा मुलीचे आई वडील व भावाला त्रास सुरूच राहिला.

माझ्याबरोबर लग्न कर नाही तर तुझ्या आई वडिलांचा खून करू अशी धमकीच त्याने मुलीला दिली होती. मुलीने अखेर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण ती वाचली. ही मुलगी हुशार असूनही केवळ भितीपोटी मुलीच्या आई वडिलांनी तिला 12 वी परिक्षेस बसू दिले नाही व घरातच ठेवले.

या मुस्लिम कुटुंबांचा अवैध दारू व गुटख्याचा मोठा धंदा असुन केवळ भितीपोटी स्थानिक कोणी पुढे येत नाही. भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे जेव्हा या मुलीच्या आई वडिलांनी तक्रार केली तेव्हा चक्र फिरले व गुन्हा दाखल झाला.या प्रकरणात वणी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी सहभागी असून गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी त्या गुन्हेगाराला सावध केले व त्याला परराज्यात फरार केल्याचा आरोप भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी केला आहे.

पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती व ब पत्र आरोपीच्या मोबाईलवर कोणी पाठवली व आरोपीने ही माहिती त्याच्या वडीलांना कशी मिळाली याचीही सखोल चौकशी करण्यात यावी. सदर पोलिसाला त्वरीत निलंबित करावे व त्याचीही सखोल चौकशी करावी असे केदार यांनी म्हटले आहे. वणी परिसरात पोलिसांच्या मुक संमतीने अवैध धंद्यांना ऊत आला असून जे जे पोलिस यात सहभागी आहेत त्यांचीही सखोल चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group