नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई , आठ लाखांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपअभियंता अटकेत
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई , आठ लाखांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपअभियंता अटकेत
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :  नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नंदुरबार या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागामध्ये काम करणार्‍या उपअभियंत्याला आठ लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभाग चर्चेत आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक परिक्षेत्रामध्ये असलेल्या नंदुरबार या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागामध्ये असलेले उपअभियंता नितीन इंगळे यांनी ठेकेदाराने 41 कोटी रुपयांचे काम केल्यानंतर त्यांच्याकडून पहिले मंजूर करताना आठ लाख 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. 

पहिले बिल मंजूर करताना यातील काही रक्कम स्वीकारली गेली होती. त्यानंतर ठेकेदाराने दुसरे बिल मंजूर करताना काही रक्कम दिली होती. सही करून पाठविण्यासाठी म्हणून उपअभियंता नितीन इंगळे यांनी नकार दिला आणि जोपर्यंत उर्वरित रक्कम मिळत नाही. तोपर्यंत पुढील बिलावर सही करणार नाही, असे सांगून उपअभियंता नितीन इंगळे यांनी नकार दिला. या संदर्भामध्ये नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली आणि त्यानंतर काल दुपारच्या सत्रामध्ये उप अभियंता नितीन इंगळे यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,  सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत दराडे, श्रीमती पद्मावती कलाल, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सधीर मोरे या पोलीस कर्मचार्‍यांनी ही कामगिरी केली.
इतर बातम्या
गंगापूर धरण

Join Whatsapp Group