नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- ७ फेब्रुवारी रोजी रात्रीचे दोन वाजता रेल्वे सुरक्षा बलाला मेसेज मिळाला की सीतापुर एक्सप्रेस मध्ये महिलेला प्रसूती कळा सुरू झालेल्या आहे .नाशिक रोड रेल्वे स्टेशन येईपर्यंत महिलेची रेल्वे डब्यातच रेल्वे प्रवाशांकडून सुखरूप प्रसूती करण्यात आली .
याबाबत अधिक माहिती अशी की ७ फेब्रुवारी रोजी रात्री मुंबईहून सुटणार्या सीतापुर एक्सप्रेसने इगतपुरी रेल्वे स्टेशन सोडताच जनरल डब्यातील आशा गोविंद फाजगे वय 23 राहणार भिवंडी मुंबई या विवाहितेला प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यावेळी डब्यातील इतर सह प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरील रेल्वे सुरक्षा बलाला सतर्क राहण्याचे सुचित करण्यात आले.
गाडी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर येताच रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक दिनेश यादव हे आपल्या सहकार्यांसह जनरल बोगीजवळ येत सदर महिलेला गाडीतून उतरवून घेत अनन्या मेडिकल येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु महिलेला अधिक रक्तस्राव झाल्याने तसेच बाळाची स्थिती नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला.
फाजगे यांचा भाऊ व भावजय हे कुटुंब नाशिक पंचवटी येथे देवदर्शन करिता येत होते. रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक दिनेश यादव, सरला भिरोटे यांनी या कामी मोलाचे सहकार्य करत तात्काळ महिलेला रुग्णालयात दाखल केले