नाशिक : धर्मांतर कर, नाही तर... न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १५ लाखांची खंडणी मागितली
नाशिक : धर्मांतर कर, नाही तर... न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १५ लाखांची खंडणी मागितली
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - न्यूड फोटो प्रसारमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन धर्मांतर केले नाही, तर 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार सन 2022 ते दि. 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संशयित आरोपी अब्दुल जलालउद्दीन शेख (रा. कालिकानगर, मुंबई नाका, नाशिक) व गुरू सलमा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये फिर्यादीसोबत फिर्यादीच्या घरी व कालिकानगर येथे काही न्यूड फोटो काढले होते.

हे फोटो प्रसारमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी फिर्यादीला दिली, तसेच फिर्यादीकडे “एक तर धर्मांतर कर, नाही तर 15 लाख रुपयांची खंडणी दे,” अशी मागणी दोन्ही संशयित आरोपींनी संगनमताने केली. या दोन्ही मागण्या मान्य केल्या नाहीत, तर फिर्यादीसह त्याच्या घरच्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेमाणे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group