Nashikroad Crime : १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केले लैंगिक अत्याचार, नंतर सोन्याचे दागिने आणि...
Nashikroad Crime : १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केले लैंगिक अत्याचार, नंतर सोन्याचे दागिने आणि...
img
Chandrakant Barve

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून, तसेच बदनामीची धमकी देऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १ फेब्रुवारी रोजी त्यांची अल्पवयीन मुलगी बराच वेळ कोणाशी तरी फोनवर बोलत होती. तिला विचारले असता मैत्रिणीशी बोलत असल्याचे तिने सांगितले. त्याच दिवशी रात्री ती मुलगी मैत्रिणीला भेटण्यासाठी म्हणून घराबाहेर गेली. मात्र बराच वेळ झाला ती न आल्याने तिच्या आईने तिला फोन लावला असता, फोन बंद लागत होता. काही वेळाने पीडितेच्या आईला एका नंबर वरून फोन आला. समोरून पीडित बोलत होती.

तिले आपल्या प्रेम प्रकरणाबाबत आईला सांगून लग्न लावून देण्यास सांगितले. तिचे राहुल गोडसे नामक युवकाशी डिसेम्बर २०२५ पासून प्रेम प्रकरण सुरु होते. तो तिला लग्न करू असे सांगून वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जायचा. दरम्यान, दि. ५ फेब्रुवारी रोजी फिर्यादी महिलेने कपाटात ठेवलेल्या वस्तूंमधून ३२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस आणि ३ लाख ५० हजार रुपयांच्या एफडीच्या पावत्या नसल्याचे दिसून आले. तरुणीला विश्वासात घेतले असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

ती म्हणाली की, १५ जानेवारी रोजी सर्कलच्या सुमारास आरोपी राहुल गोडसे पीडितेला शिवशाही लॉज वॉर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्या उसाचे विरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर त्याने तिला धमकावून व शिवीगाळ करून तू कोणाला सांगितले तर तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. नंतर तो त्याच ठिकाणी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करत राहिला. १ फेब्रुवारी रोजी राहुलने धमकावल्याने पीडितेने घरातील दागिने व एफडीच्या पावत्या त्याच्या ताब्यात दिल्या. 

आरोपी राहुल गोडसे (वय २७, रा. संसरी, ता. जि. नाशिक) यांनी फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून लग्नाचे आमिष दाखविले, तसेच बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याशी बिटको कॉलेज परिसरात असलेल्या एका लॉजवर नेऊन वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर शिवीगाळ आणि हाताच्या चापटीने मारहाण करून तिला धमकावून घरातून सोन्याचे दागिने व एफडीच्या पावत्या आणावयास लावून त्या बळजबरीने आरोपीने स्वत:च्या ताब्यात घेतल्या.

वारंवार होणार्‍या या छळाला कंटाळून अखेर उपनगर पोलीस ठाण्यात राहुल गोडसेविरुद्ध पोक्सोअंतर्गत बलात्कराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group