"त्या" संगीत गायनाच्या कार्यक्रमाबाबत मनपाने केला "हा" महत्त्वाचा खुलासा
img
दैनिक भ्रमर

सलीम–सुलेमान यांच्या संगीत कार्यक्रमाच्या नावाने प्रसारित करण्यात येत असलेल्या जाहिरातीमध्ये “साधुग्राम, तपोवन, नाशिक” असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, साधुग्राम परिसरात अशा कोणत्याही प्रकारचा संगीत-गायनाचा कार्यक्रम आयोजितकरण्यात आलेला नाही.

तसेच सदर कार्यक्रमासाठी नाशिक महानगरपालिकेकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, हे स्पष्ट करण्यात येत आहे. सदर जाहिरात ही नागरिकांची दिशाभूल करणारी असून, चुकीची माहिती पसरविण्याचा प्रकार आहे. 

नाशिक महानगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, परवानगीशिवाय किंवा चुकीची माहिती देत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

नागरिकांनी अशा प्रकारच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group