Nashik : सुवणतीर्थच्या मालकाकडून महिला डॉक्टरच्या अडीच लाखांचा अपहार
Nashik : सुवणतीर्थच्या मालकाकडून महिला डॉक्टरच्या अडीच लाखांचा अपहार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सुवर्णसंचय योजनेची खोटी माहिती देऊन त्यापोटी गुंतवणूक करण्यास भाग पाडून महिला डॉक्टरची अडीच लाख रुपयांचा करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी अजय सुभाष लोखंडे (रा. रामेश्‍वरनगर, कॅनॉल रोड, गंगापूर रोड) यांच्या मालकीचे कॅनडा कॉर्नर येथे सुवर्णतीर्थ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दुकानमालक अजय लोखंडे व दुकानाच्या मॅनेजर पूजा वाघ या दोघांनी संगनमत करून फिर्यादी डॉ. रोहिणी तुषार घुगे (रा. सायखेडा, ता. निफाड) यांना सुवर्णसंचय योजनेची खोटी माहिती देऊन त्यांचा विश्‍वास संपादन केला. 

दि. 2 जून 2024 ते 7 जून 2025 या कालावधीत फिर्यादीकडून प्रतिमहिना 18 हजार 336 रुपये याप्रमाणे समान 13 हप्ते रोख स्वरूपात घेतले आहेत. आरोपी लोखंडे व पूजा वाघ यांच्याकडे फिर्यादी घुगे यांनी 2 लाख 42 हजार 268 रुपये जमा करून सुवर्णसंचय योजनेत गुंतवणूक केली; मात्र आरोपींनी फिर्यादीने जमा केलेली रक्कम परत न करता त्या रकमेचा अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली. त्यानंतर अजय लोखंडेविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचे काही गुन्हे दाखल आहेत. 

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डगळे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group