नाशिक : बॅनरवर शेवटी फोटो टाकल्याचा राग अन... तिघांनी युवकाला डांबून ठेवत उकळली १० हजारांची खंडणी
नाशिक : बॅनरवर शेवटी फोटो टाकल्याचा राग अन... तिघांनी युवकाला डांबून ठेवत उकळली १० हजारांची खंडणी
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : कॉलेजच्या निवडणूक बॅनरवर सर्वात शेवटी फोटो का टाकला. या कारणावरून कुरापत काढून तिघांनी एका युवकास रूममध्ये डांबून ठेवत त्याच्याकडून 10 हजार रुपयांची मागणी ऑनलाईन वसूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी गौरव घुगे याने 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी साहिल दीपकराव डहाले (वय 21, रा. साईवास्तू रो हाऊस, ध्रुवनगर, नाशिक) याला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फोन करुन पिंपळगाव बहुला येथे बोलावून घेतले. फिर्यादी व फिर्यादीच्या मित्रांना बळजबरीने मिनी बसमध्ये बसवून मोकळ्या मैदानावर घेऊन गेले. 

तेथे आरोपी गौरव घुगे याने कॉलेजच्या निवडणूक बॅनरवर सर्वांत शेवटी फोटो का टाकला, या कारणावरून कुरापत काढली. त्यावेळी गौरव घुगे व त्याच्या दोन मित्रांनी फिर्यादी साहिल याला शिवीगाळ करून पिंपळगाव बहुला येथील रुमवर डांबून ठेवत दारू पिऊन त्याला मारहाण केले. तसेच फिर्यादीच्या मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने 10 हजार रुपयांची खंडणी वसूल केली.  तसेच 17 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत फिर्यादीला डांबून ठेवत सायंकाळपर्यंत पुन्हा 10 हजार रुपये दिले नाहीत, तर तुला परत उचलून नेऊ, अशी धमकी दिली.

याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गौरव घुगे व त्याच्या दोन मित्रांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक न्याहाळदे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group