मोठी बातमी ! अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा कार अपघातात मृत्यू
मोठी बातमी ! अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा कार अपघातात मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी रस्त्यावरील धोत्रे गावाजवळ भीषण अपघात घडला आहे.  या अपघातात भोंदू अशोक खरात याचा अत्यंत जवळचा सहकारी आणि शिवानिका ट्रस्टचे संचालक, उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर जखमी मुलाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 



धोत्रे गावाजवळ शिर्डीकडे जाताना उभ्या कंटेनरच्या मागे ही कार घुसली. समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. त्याची छायाचित्र आणि व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवणारी आहेत. ही कार चक्काचूर झाली आहे. खरातचे प्रकरण समोर आल्यापासून जितेंद्र शेळके हे तणावात असल्याचे समोर येत आहे. शेळकेंच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी असल्याचे समोर येत आहे. आता या अपघाताने अनेक प्रश्न निर्माण केले आहे. हा अपघात होता की घातपात यावर अनेक जण शंका उपस्थित करत आहे. 

अशोक खरातच्या एन्काऊंटरची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. खरातचे राजकीय आणि प्रशासकीय कनेक्शन पाहता, त्याच्याकडे अनेकांचे रहस्य दडलेले आहेत. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे, असा दावा विरोधक सातत्याने करत आहेत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या भीषण अपघाताने आता अशोक खरातचा एन्काऊंटर होणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी याविषयीचे ट्वीट केले आहे, त्यावरून खळबळ उडाली आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group