नाशिक धर्मांतर प्रकरण : फरार निदा खानची अटकपूर्व जामिनासाठी धडपड
नाशिक धर्मांतर प्रकरण : फरार निदा खानची अटकपूर्व जामिनासाठी धडपड
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील धर्मांतर प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकमधील नामांकित कंपनीत काम करणाऱ्या तरुणींवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानली जाणारी संशयित आरोपी निदा खान  21 दिवसांपासून फरार असून, अटक टाळण्यासाठी तिने आता कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच जामीन मिळवण्यासाठी निदा खानने वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली आहे.



निदा खानवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. प्रतिष्ठित कंपनीत काम करणाऱ्या तरुणींना हेरून, त्यांचे ब्रेनवॉश करणे आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मानसिक दबाव टाकणे, असे कृत्य ती करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मोठे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, निदा खानच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे होऊ शकतात. तसेच निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा देखील संशय तपास यंत्रणे कडून व्यक्त केला जातोय.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आपला तपास अधिक तीव्र केला आहे. निदा खानचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके भिवंडी, मुंबई, पुणे आणि नाशिकमधील संभाव्य ठिकाणांवर रवाना झाली आहेत. यापूर्वी पोलिसांनी नाशिक आणि पुण्यातील काही संशयास्पद ठिकाणांची झडती घेतली, मात्र निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. गरोदर असल्याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी निदा खानकडून जामीनासाठी नाशिकरोड न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निदा खानच्या अटकपूर्व जमीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. निदा खान अद्याप फरार असून, नाशिक पोलिसांचे पथक तिच्या मागावर आहे. निदाच्या अटकपूर्व जामिनावर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलं आहे. 

 कोण आहे निदा खान?
नाव - निदा एजाज खान 
वय - 26 वर्ष 
- 2021पासून निदा खान ही कंपनीत काम करत होती. 
- कंपनीतील टीम लीडर ची प्रमुख आणि कंपनीत काम करणाऱ्या मुलींची टार्गेट टीम प्रमुख म्हणून काम करत होती.
- नाशिकच्या द्वारका परिसरात निदा खान हिचे माहेर असून तिचे पती एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती आहे.
- कंपनीत नवीन महिला किंवा तरुणी कामाला आल्यानंतर त्यांना या आरोपीकडून ट्रेनिंग देण्याची शिफारस निदा खान करत असे. 
- आरोपींच्या प्रेमात आणि ठरवलेल्या धर्मांतर षड्यंत्रात मुली अडकवण्यासाठी तिची मुख्य भूमिका होती.
- या प्रकरणात आर्थिक मदत लागत असेल तर इतर आर्थिक मदत आरोपींना आवश्यक नुसार करत होती.
- निदा खान तिच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणातील मास्टरमाइंड नेमका कोण आहे याचा खुलासा होणार असल्याने तिची अटकेची कारवाई महत्त्वाची आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group