लग्नानंतर पत्नीच्या जुन्या संबंधांचा धक्कादायक खुलासा, विवाहित तरुणाचा मृत्यू
लग्नानंतर पत्नीच्या जुन्या संबंधांचा धक्कादायक खुलासा, विवाहित तरुणाचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर


आजकाल विवाहबाह्य संबंधांच्या अनेक घटना समोर येत असून आता छत्रपती संभाजीनगर मधून देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहानंतरही पत्नीचे तिच्या जुन्या प्रियकरासोबत संबंध असल्याच्या संशयातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे एका विवाहित तरुणाने सासरच्या घरी विषारी औषधाचे सेवन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल पंधरा दिवस उपचार सुरू असताना 7 मे रोजी त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पत्नी, तिचा कथित प्रियकर तसेच सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींमध्ये वैष्णवी कृष्णा गरड, तिचा कथित प्रियकर कृष्णा दांडगे तसेच वैष्णवीचे आई-वडील मीरा नागनाथ सोनवणे आणि नागनाथ बलभीम सोनवणे यांचा समावेश आहे. मृत तरुणाचे नाव कृष्णा अण्णासाहेब गरड असे आहे. फिर्यादीनुसार, त्यांचे लग्न सुमारे सात वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना दोन मुले आहेत. सुरुवातीला काही वर्षे ते एकत्र राहत होते, मात्र नंतर पत्नीच्या आग्रहामुळे ते वेगळ्या भाड्याच्या घरात राहू लागले.

समोर आलेल्या माहितीनुसार , यानंतर पत्नीच्या मोबाईलवर वारंवार येणाऱ्या कॉल्समुळे संशय वाढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीचा जुना प्रियकर असल्याचे समोर आल्याचा आरोप आहे. पुढे या संबंधांवरून कुटुंबात वाद निर्माण झाला आणि मानसिक तणाव वाढत गेल्याने ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.मिळालेल्या  माहितीनुसार , 22 एप्रिल रोजी मुलांची आठवण आल्याने कृष्णा सासरच्या घरी गेला होता. त्याच ठिकाणी त्याने विषारी औषध सेवन केले. त्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास 15 दिवस उपचार सुरू असताना 7 मे रोजी त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वैष्णवी गरड, मीरा सोनवणे, नागनाथ सोनवणे आणि कृष्णा दांडगे यांना अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे .  


इतर बातम्या
Join Whatsapp Group