धक्कादायक !  चालत्या बसमध्ये महिलेवर अत्याचार , कुठे घडली घटना
धक्कादायक ! चालत्या बसमध्ये महिलेवर अत्याचार , कुठे घडली घटना
img
Nandini khandare More




देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चाललंय असून सध्या महिला कुठेही सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. दरम्यान आता अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही  घटना दिल्ली मध्ये एका महिलेसोबत घडली आहे. 

या प्रकरणामुळे देशाच्या राजधानीत मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत बस चालक आणि कंडक्टरला अटक केली आहे. संबंधित घटनेत वापरण्यात आलेली बसही पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दिल्लीतील राणी बाग परिसरात ही घटना घडली. पीडित महिला पीतमपुरा येथील झोपडपट्टी भागात राहते आणि मंगोलपुरी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करते. कामावरून घरी परतत असताना तिच्यासोबत बसमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group