धक्कादायक ! शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला, गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं
धक्कादायक ! शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला, गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं
img
Nandini khandare More

राज्यातील गुन्हेगारीच्या घटना वाढत असून आता या घटनांवर आला घालणे कठीण झाले आहे. दरम्यान आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदे सेनेच्या उपजिल्हाप्रमुखाला महावीर चौकात भेटायला बोलावून त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी (ता. २४) मध्यरात्री घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार , अंबादास आसाराम म्हस्के (वय ५५, रा. म्हस्के गल्ली) असे जखमी पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, राम शेषराव बोडखे (रा. टीव्ही सेंटर) असे आरोपीचे नाव आहे. 

याप्रकरणी खंडू भीमराव म्हस्के यांनी तक्रार दिली. त्यानुसार रविवारी रात्री दहाला राम अंबादास यांना वारंवार फोन करत होता. शिरसाठ यांचे नाव घेऊन शिवीगाळ केली. हिंमत असेल तर बाबा पेट्रोल पंपावर भेटायला ये, असे तो म्हणाला. अंबादास यांनी पुतण्या खंडू याला याबाबत कल्पना दिली. त्यानंतर दोघे चुलते-पुतणे हे एका वाहनातून  तेथे रात्री साडेअकराला पोचले. तेथे आरोपी राम पूर्वीपासून उभा होता. अंबादासहे रामला भेटायला गेले. यावर रामने कमरेचा चाकू काढून त्यांच्या गळ्यावर वार केला. यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. पुतण्या खंडू यांनी रामला धक्का देऊन बाजूला केले. यानंतर अंबादास यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group