ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच मोठा गोंधळ ! नेमकं काय घडलं
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच मोठा गोंधळ ! नेमकं काय घडलं
img
Nandini khandare More
राज्यातील राजकरणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर  हे दोन्ही खासदार तिरूपती बालाजी दर्शानासाठी गेले होते.  याचदरम्यान ते विमानतळावर पोहण्यापूर्वीच मोठा गोंधळ निर्माण झाला असल्याचा प्रकार घडला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही खासदार तिरूपती बालाजी दर्शानासाठी गेले होते. अशात शिवसेना जिल्हाप्रमुख, निंबाळकरांचे समर्थक तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाजूला थांबण्याच्या सूचना दिल्यानंतर हा वाद सुरू झाला. 

खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी सुरक्षा कारणास्तव कार्यकर्त्यांना दुसऱ्या ठिकाणी थांबण्यास सांगितले. मात्र, स्वागताची जागा हीच असल्याचे सांगत राजेंद्र जंजाळ यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी जोरदार वाद घातला.

दरम्यान, इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी माध्यमांशी बोलताना, “पोलीस त्यांचं काम करत आहेत आणि आम्ही आमचं काम करत आहोत. नवीन अधिकाऱ्यांना स्वागताची जागा माहित नव्हती,” असे सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group