बापरे !  एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार? काय आहे नवी अपडेट ?
बापरे ! एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार? काय आहे नवी अपडेट ?
img
Nandini khandare More
गेल्या अनेक महिन्यांपासून आखाती देशांच्या तणावांमध्ये देशाला मोठ्या प्रामानातं  इंधन तुटवडा सहन करावा लागला तसेच महागाईने देखील चांगलेच डोके यावर काढले होते परंतु मागच्या महिन्यात हे युद्ध थांबले असल्याची घोषणा करण्यात आली होती परंतु आता पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. 

एलपीजी गॅस घेऊन भारताच्या दिशेने निघालेल्या एका जहाजावर मोठा हल्ला होर्मुज खाडीत करण्यात आला. यासोबतच अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले करण्यात आले. त्यामध्येच होर्मुज खाडीतही तणाव वाढला. होर्मुज खाडीत सतत गोळीबार केला जात आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा एलपीजीचे टेन्शन वाढले. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. यासोबतच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. भारतात दाखल होणारा 60 टक्के एलपीजी गॅस हा होर्मुज खाडीच्या माध्यमातून दाखल होतो. इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅस सिलेंडरच्य किमतीमध्ये मोठी वाढ झाली. त्यामध्येच होर्मुज खाडीत तणाव वाढल्याने आता पुन्हा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

केप्लर एनालिस्ट सुमित रितोलिया यांच्या म्हणण्यानुसार, सध्या जी परिस्थिती आहे, तिचा भारतामध्ये होणाऱ्या एलपीजी गॅस आयातीवर काही परिणाम झाला नाही. भारतीय रिफायनरी कंपन्या तेल विविध माध्यमातून भारतात आणत आहेत. होर्मुज खाडीत तणाव आहे. गेल्या 100 दिवसांपासून भारतात स्थिती सामान्यच आहे. भारत हा मोठ्या प्रमाणात कच्चे तेल रशियाकडूनच आयात करतो.

सऊदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्याकडून होणाऱ्या पुरवठ्याकरिता अजून काही मार्ग आहेत. आज पूर्ण देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल हा सरकारकडून करण्यात आला नाहीये. 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 942 आहे आणि 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 2930 रूपये आहे. मात्र, परिस्थिती जर अधिक बिघडली तर केंद्र सरकारकडून काही बदल केले जाऊ शकतात.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सरकारकडून कमी करण्यात आल्या. त्यातच आता पुन्हा तणाव वाढला. जर होर्मुज खाडीतील स्थिती सामान्य झाली नाही तर केंद्र सरकारकडून याबाबत काही वेगळे निर्णय घेतला जाऊ शकतात. सध्या तरी भारताकडे मुबलक प्रमाणात साठा आहे. जागतिक बाजारात पुन्हा एकदा खळबळ उडाली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group