नागराज मंजुळेच्या पहिल्या पत्नीने केले ''हे'' गंभीर आरोप ! म्हणाल्या चामड्याच्या पट्ट्याने...
नागराज मंजुळेच्या पहिल्या पत्नीने केले ''हे'' गंभीर आरोप ! म्हणाल्या चामड्याच्या पट्ट्याने...
img
Nandini khandare More

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे त्यांच्या दमदार चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र त्यांच्या कलाकृतींसोबतच वैयक्तिक आयुष्यानेही अनेकदा माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, नागराज मंजुळे यांच्या पहिल्या पत्नीचे सध्याचे आयुष्य कसे आहे आणि त्या आता काय करतात, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.दरम्यान आता एक अपडेट सामोर आली आहे. 

नागराज यांच्या पहिल्या पत्नी सुनीता मंजुळे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे . सुनीता आणि नागराज यांचे लग्न १७ मे १९९७ रोजी झाले होते. त्या वेळी नागराज बारावीत शिकत होते आणि सुनीता केवळ १८ वर्षांच्या होत्या. 'क्विंट'ला दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता यांनी सांगितले की, नागराज चित्रपट क्षेत्रात करिअर घडवत असताना त्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्याने सांभाळत होत्या.

सुनीता म्हणाल्या, “मला असे वाटते की त्यांना माझी लाज वाटायची. ते कलाक्षेत्रातील लोकांमध्ये वावरतात, महाराष्ट्रातील मोठमोठे लोक त्यांचा आदर करतात, पण मी केवळ आठवीपर्यंत शिकलेली आहे. त्यामुळे त्यांना मी फक्त घरची कामे करण्यासाठी आणि कुटुंब सांभाळण्यासाठी योग्य वाटले, पण सार्वजनिकरित्या अभिमानाने पत्नी म्हणून ओळख करून देण्याइतकी नाही.”

त्या पुढे म्हणाल्या, “ते यशस्वी झाल्यावर माझ्या कमी शिक्षणाची त्यांना लाज वाटू लागली आणि त्यांनी मला दूर केले. सुरुवातीचे दिवस दुर्लक्ष, उपेक्षा आणि मारहाणीचे होते. त्यांनी मला मूल होऊ दिले नाही. त्यासाठी मला चामड्याचे पट्टे व लाकडाच्या तुकड्याने मारहाणही करत असत. 'फँड्री'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर जेव्हा ते दिल्लीला गेले, तेव्हा त्यांनी मला घरात कोंडून ठेवले आणि बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही.”

सध्या सुनीता मंजुळे आणि नागराज मंजुळे यांचा घटस्फोट झाला आहे. तडजोडीचा भाग म्हणून सुनीता यांना सात लाख रुपये देण्यात आले होते. उदरनिर्वाहासाठी आणि वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी त्या सध्या इतरांच्या घरी साफसफाईचे काम करतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group