तिसऱ्या अपत्यासाठी मॅटर्निटी लिव्ह कितपत योग्य? काय म्हणाल्या अमृता फडणवीस ?
तिसऱ्या अपत्यासाठी मॅटर्निटी लिव्ह कितपत योग्य? काय म्हणाल्या अमृता फडणवीस ?
img
Nandini khandare More
तमिळनाडू सरकारने तिसऱ्या अपत्यासाठी मॅटर्निटी लिव्ह देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयावरून आत सर्वच स्तरातून प्रतिक्रया येत असून आता या निर्णयावर अमृता फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

तमिळनाडू सरकारने तिसऱ्या अपत्यासाठी मॅटर्निटी लिव्ह देण्याच्या निर्णयाबाबत दिव्यज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, मुलाला जन्म देणाऱ्या महिलेला त्याच्या संगोपनासाठी वेळ आणि सुट्टी मिळणे हा तिचा अधिकार आहे. मात्र, देशाची लोकसंख्या आधीच मोठी आहे. त्यामुळे तिसऱ्या मुलासाठी मॅटर्निटी लिव्ह देण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे.

जुन्नर येथील बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर त्यांनी सांगितले की, मुलींच्या संरक्षणासाठी कायदा करण्यात आला असून, घटना घडल्यानंतर कारवाई होत आहे. मात्र, तरीही समाज म्हणून आपण कुठे कमी पडत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group