मोठी बातमी ! 26 IAS अन् 53 RAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
मोठी बातमी ! 26 IAS अन् 53 RAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
img
Nandini khandare More
देशभरातील अनेक घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा 26 IAS आणि 53 RAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. तसेच 14 प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्यांची विविध जिल्ह्यांमधील जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात OSD पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या सर्व RAS अधिकाऱ्यांना तातडीने नवीन पदावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने एकाच ठिकाणी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने हा मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. याआधी गेल्या आठवड्यातही अनेक RAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता आज किंवा उद्या लागू होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने विविध विकास प्राधिकरणे आणि महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सचिव पदांवरही फेरबदल केले आहेत. अजमेर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त नित्या के यांची ऊर्जा विभागात संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जैसलमेर जिल्हा परिषदेच्या CEO रश्मी राणी यांना अजमेर विकास प्राधिकरणाचे आयुक्त करण्यात आले आहे. श्रीगंगानगर जिल्हा परिषदेचे CEO गिरधर यांची भिवाडी इंटिग्रेटेड विकास प्राधिकरणाच्या (BIDA) CEO पदावर बदली करण्यात आली आहे. तर जोधपूर विकास प्राधिकरणाचे आयुक्त उत्साह चौधरी यांना आपत्ती व्यवस्थापन विभागात संयुक्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

अलवर UITच्या सचिव धायगुडे स्नेह नाना यांची बिकानेर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सवाई माधोपूर जिल्हा परिषदेचे CEO गौरव बुडानिया यांना अजमेर महापालिकेचे आयुक्त करण्यात आले आहे. तसेच अलवर जिल्हा परिषदेचे CEO सालुखे गौरव रविंद्र यांची भीलवाडा UITच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशासकीय फेरबदलामुळे राजस्थानमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर मोठे बदल झाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group