एल-निनोचा कहर !जगभर उष्णतेची लाट, भारतालाही सतर्कतेचा इशारा
एल-निनोचा कहर !जगभर उष्णतेची लाट, भारतालाही सतर्कतेचा इशारा
img
Nandini khandare More
जागतिक हवामान संस्था (WMO) ने हवामानाबाबत महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत अल निनो (El Niño) अधिक सक्रिय होण्याची शक्यता असल्याने जगातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होऊ शकते. या बदलाचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या हवामानावर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.याचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जागतिक हवामान संस्थेने सांगितले की, अल-नीनोची तीव्रता सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांत उष्णतेची लाट वाढू शकते, तसेच पावसाचे स्वरूप आणि वेळेतही बदल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर समुद्राचे तापमान आधीच सरासरीपेक्षा अधिक असल्याने हवामानावरील परिणाम आणखी तीव्र होऊ शकतो. त्यामुळे भारतासह जगातील अनेक देशांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

WMO च्या अहवालानुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत जगातील बहुतांश भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. यात भारत, आफ्रिका, युरोपमधील काही भाग, अरब देश, पूर्व आशिया आणि दक्षिण अमेरिका यांचा समावेश आहे. या वाढणाऱ्या तापमानामुळे पावसावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, याचा शेती क्षेत्राला सर्वाधिक फटका बसू शकतो.

भारतात पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता

एल निनोमुळे भारतात पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. WMO च्या अंदाजानुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर सकारात्मक इंडियन ओशन डिपोल तयार होण्याचे संकेतही मिळाले असून, त्याचाही हवामानावर परिणाम होऊ शकतो. अल-नीनो आणि IOD हे दोन्ही घटक एकत्रितपणे काही भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण करू शकतात, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group