कॉकरोच जनता पार्टीने नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणावरून आक्रमक पवित्र घेऊन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाला सुरूवात केली. जोजवळपास एक महिन्यापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. याचदरम्यान आता अभिजित दीपके यांनी जंतर-मंतर सोडल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी त्यांनी स्वतःच पोस्ट करत माहिती दिली आहे.
यादरम्यानच आता अभिजीत दिपके यांच्या आरोग्याबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. अभिजीत दिपके यांनी आंदोलकांची माफी मागितली आहे. अभिजीत दिपके यांनी जंतर मंतर मैदान सोडले. अभिजीत दिपके यांनी सांगितले की, ताप आहे आणि शरीरमध्ये खूप जास्त त्रास आहे. 20 जूनपासून जंतर मंतरवर अभिजीत दिपके आंदोलन करत आहेत.
या आंदोलनात लोकांची संख्या सतत वाढत आहे. अभिजीत दिपके यांना आज त्रास सहन होत नव्हता. एक्सवर पोस्ट शेअर करत अभिजीत दिपके यांनी समर्थकांकडे आरामाची मागणी केली आणि माफी मागितली. दिपके यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, मला ताप आहे. गेल्या काही दिवसांपासून शरीरामध्ये खूप जास्त त्रास आहे.
मी पेनकिलर खाऊन राहत होतो. मी जर तुम्हाला जंतर मंतरवर दिसलो नाही तर मला माफ करा. मला आराम करण्याची आणि तब्येत व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. मी सायंकाळपर्यंत पुन्हा आंदोलनात सहभागी होईल. आता अभिजीत दिपके यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिजीत दिपके जंतर मंतरवर आंदोलन करत आहे.