कॉकरोच जनता पार्टीने दिला ''हा'' मोठा इशारा
कॉकरोच जनता पार्टीने दिला ''हा'' मोठा इशारा
img
Nandini khandare More
cjp ने सुरु केलेल्या आंदोलवरून सध्या देशात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू आहे.  26 दिवसांनंतर सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडले. मात्र, कॉकरोच जनता पार्टी अजूनही राजीनाम्यावर ठाम असून आता  कॉकरोच जनता पार्टीने सरकारला मोठं इशारा दिला आहे. 

आज सरकारसोबत चर्चा करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ जाणार आहे. आम्ही चर्चेसाठी कधीही तयार आहोत, तुम्ही वेळ आणि दिवस सांगा असे आवाहन सरकारकडून आंदोलकांना करण्यात आले होते. यासोबतच चर्चेसाठी तब्बल 4 वेळा प्रस्ताव सरकारने आंदोलकांना दिला. मात्र, आंदोलकांनी सरकारसोबत चर्चा न करण्याचा निर्णय घेतला. 

26 दिवसांनंतर सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडले. मात्र, कॉकरोच जनता पार्टी अजूनही राजीनाम्यावर ठाम आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जंतर मंतर मैदान सोडणार नसल्याची भूमिका कॉकरोच जनता पार्टीने घेतली. आता शिष्टमंडळ आणि सरकारमधील बैठकीत नक्की काय निर्णय होतो, हे पाहण्यासारखे ठरेल.

यादरम्यानच आता आशुतोष रांका याने सरकारसोबतच्या चर्चे अगोदरच जंतर मंतरवरून मोठे विधान केले. आशुतोष रांकाने म्हटले की, आज 12.30 वाजता आम्ही सरकारसोबत चर्चा करण्यासाठी जाणार आहोत. पण आम्ही स्पष्ट शब्दात सांगितले की, आम्हाला हवाबाजी नाही पाहिजे. तुम्हाला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. तुम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागेल.

त्याच्याखाली काहीच मान्य नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊनच जंतर मंतरवरून निघणार. सोनम वांगचूक आणि इथे जमलेल्या सर्वांनी आपला जीव धोक्यात घालून इथे सर्वांना जमा केले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सोनम वांगचूक यांचा संघर्ष कधीच विसरणार नाहीत. आता जबाबदारी आमची आहे. आपल्याला इथेच राहायचे आहे आणि लढा द्यायचा आहे, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही.

26 दिवस सोनम वांगचूक उपाशी होते, आपल्याला त्यांच्या संघर्षाला असेच जाऊ द्यायचे नाही. कॉकरोच जनता पार्टी जरी सरकारसोबत चर्चेसाठी तयार झाली असली तरीही त्यांच्याकडून अजूनही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीमध्ये झालाच पाहिजे, या मुद्द्यावर विरोधकही आक्रमक घेत आहेत. संसदेबाहेर घोषणाबाजी केली जातंय. आज याबाबत फैसला होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group