खळबळजनक प्रकार! मुलांना खाऊ घातल्या जाणाऱ्या नूडल्समध्ये किडे आणि बुरशी
खळबळजनक प्रकार! मुलांना खाऊ घातल्या जाणाऱ्या नूडल्समध्ये किडे आणि बुरशी
img
Nandini khandare More

नूडल्स लहान मुलानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडतात. परंतु आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या या नूडल्सचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. 
पिंपरी-चिंचवड शहरातील बोपखेल परिसरात एका व्यक्तीने दुकानातून खरेदी केलेल्या पॅक बंद नूडल्सच्या पाकिटात बुरशीसदृश थर आणि कीटक दिसून आल्याचा आरोप संबंधित ग्राहकाने केला आहे. या घटनेनंतर ग्राहकांमधून पॅकेट बंद फूडवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नेमकं काय घडलं? नांदेडच्या बोपखेल परिसरात राहणाऱ्या महेंद्र भिंगारदिवे यांच्या कुटुंबीयांनी नूडल्सच पॅकेट खरेदी केलं होत. ते शिजवण्यासाठी उघडण्यात आलं.

मात्र पॅकेट उघडताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित पाकीट मुदतबाह्य होण्या आधीच नूडल्सवर काळपट आणि हिरवट रंगाचा बुरशीसदृश थर आणि कीटक दिसून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

संबंधित ग्राहकाने नूडल्सच्या पाकिटावरील बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, ‘बेस्ट बिफोर’ तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासून कंपनी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. आता या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तसेच अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले तुकाराम मुंढे नेमकी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागल आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group