नाशिक शहरात 76 टक्के बालकांचे  पोलिओ लसीकरण पूर्ण
नाशिक शहरात 76 टक्के बालकांचे पोलिओ लसीकरण पूर्ण
img
Nandini khandare More

 जन्माला आलेल्या बाळापासून ते ५ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक लहान मुलाला पोलिओचे दोन थेंब देणे पालकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ५८ हजार १६१ बालकांना रविवारी (दि. २८) पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला. शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या २ लाख ७ हजार ५६० लाभार्थ्यांपैकी ७६ टक्के लसीकरण पूर्ण झाले.

शहरातील विविध भागांतही पोलिओ बूथचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या २४ टक्के बालकांसाठी २९ जून ते ३ जुलै या कालावधीत विशेष घरोघरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत मनपाचे आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन बालकांना पोलिओची लस देणार असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group