बॉक्स ऑफिसवर ‘देऊळ बंद 2' चा  धुमाकूळ ! फक्त 5 दिवसांत कमावले तब्बल ''इतके'' कोटी रुपये
बॉक्स ऑफिसवर ‘देऊळ बंद 2' चा धुमाकूळ ! फक्त 5 दिवसांत कमावले तब्बल ''इतके'' कोटी रुपये
img
Nandini khandare More


नुकताच रिलीज झालेल्या 'देऊळ बंद 2' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलं असून अवघ्या ५ दिवसात घमासान कमाई केली आहे. अजूनही प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद या सिनेमाला उंचच उंच भरारी देणार आहे. 

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं दिसून येत आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. 

'देऊळ बंद 2'चे अनेक शोज हाऊसफुल्ल होत आहेत. इतंकच नाही तर अगदी पहाटेच्या शोलाही प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 11 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. त्यानंतर रविवारी थेट 6.10 कोटी रुपयांची कमाई झाली. पहिल्या वीकेंडनंतर सोमवारीही कमाईचा आकडा सकारात्मक होता. 

'देऊळ बंद 2'ने गेल्या पाच दिवसांत 20 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचा बजेट 7 ते 8 कोटी रुपयांदरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बजेटचा हा खर्च आधीच वसूल झाला आहे. यामध्ये स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या दोघांच्या भूमिकांमधील जुगलबंदी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group