भीषण ! सुरतमध्ये  दोन एसटी बसेसचा अपघात, सात प्रवाशांचा मृ्त्यू
भीषण ! सुरतमध्ये दोन एसटी बसेसचा अपघात, सात प्रवाशांचा मृ्त्यू
img
Nandini khandare More


आजकाल अनेक भीषण अपघाताच्या घटना घडत आहेत. दरम्यान आता अशीच एक भीषण अपघाताची बातमी सुरत येथून समोर आली आहे. 
महाराष्ट्राच्या सीमेवरील सुरत येथे एसटी महामंडळाच्या दोन बसेसचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात प्रथमदर्शनी सात प्रवाशांचा मृत्यू झाले असून 41 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरु झाले आहे. हा अपघात इतका मोठा होता की बसच्या धडकेत दुसरी बस रस्त्यावर कलंडली. या प्रकरणाती जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

सूरतमधील बारडोली येथील उवा गावामध्ये दोन एसटी बसेसच्या भीषण  अपघाताची भीषण घटना घडली आहे.  सुरत ते धुळे मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला मागून एका ट्रकने ठोकरल्याने ही बस रस्त्याचा दुभाजक ओलांडून शेजारी लेनमध्ये घुसली. त्याच वेळी त्याच मार्गावर जामनेर ते सुरत धावणाऱ्या बसला धडक लागल्याने ही बस रस्त्याच्या खाली घसरून तिने पेट घेतला. दोन्ही बसेसच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे.  या अपघातात सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बसचा चक्काचूर होऊन एका बसला आग लागल्याची घटना घडली आहे.

बस क्रमांक एम.एच. १८ बीझेड १२५८ सुरत ते धुळे मार्गावर धावत होती. गुजरात हद्दीत व्याराजवळ ही बस आली असताना मागून येणाऱ्या एका ट्रकने धडक दिली. त्यामुळे एसटी बस दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूला कलंडली. याचवेळी त्याच मार्गावर जामनेर ते सुरत धावणाऱ्या बस क्रमांक एम.एच. २० बीएल ३३६० ला धडक लागल्याने ही बस रस्त्याच्या खाली घसरून तिने पेट घेतला. या दोन्ही बसमधील चालकांचा मृत्यू झाला आहे. तर ५ ते ६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अंदाजे चार ते पाच प्रवाशांना गंभीर होरपळले असल्याची माहिती मिळाली आहे.

सुरत येथील भीषण अपघातात जळगावच्या भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील चालकाचा मृत्यू झाला आहे. घनश्याम राघो बरकले असे मृत्यू झालेल्या ४२ वर्षीय बस चालकाचे नाव आहे. बस चालकाच्या कुटुंबाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने सुरत येथील अपघाताच्या ठिकाणी रवाना झाल आहेत. सुरत येथे भीषण अपघातातील बस क्रमांक  एमएच 20 बी एल 33 90 ही जामनेर आगाराची होती, त्यावर घनश्याम बरकले हे चालक म्हणून कर्तव्यावर होते. अपघातामध्ये या बसला आग लागून त्यातील सहा प्रवासी तसेच बस चालक यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापही प्रवाशांची ओळख पटलेली नाही. असे  जळगावचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group