सर्वजण सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असून सध्या राज्यांमध्ये ढगाळ वातावरण असून आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. जोरदार वारेही सुटले आहे. आयएमडीच्या मते, येत्या काही तासांत अनेक भागात हवामान अचानक बदलू शकते. धुळीच्या वादळ्यांसह विजांचा कडकडाट आणि पाऊस होऊ शकतो. काही राज्यात गारपिटीचाही मोठा इशारा देण्यात आला.
ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडीत वादळाला सुरूवात झाली.हवामानशास्त्रज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या प्रणालींचा परिणाम देशातील हवामानावर होऊ शकतो. भारतातील जवळपास सर्वच राज्यात वातावरणात मोठा बदल जाणवेल. नैऋत्य मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे.
केरळमध्ये आज मॉन्सून दाखल होईल. केरळमध्ये मॉन्सूनकरिता अनुकूल वातावरण आहे. त्यानंतर पुढे पुढे मॉन्सून सरकेल. भारतीय हवामान विभागाच्या मते, येत्या काही तासांत मान्सून केरळमध्ये येईल. त्यानंतर दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तसा अंदाज आहे. अनेक राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तब्बल 17 राज्यांवर संकट आहे. अतिमुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे यादरम्यान असेल. मुसळधार पावसादरम्यान नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले. सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, पुदुचेरी, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, आसाम, मेघालय यासोबतच अंदमान निकोबार बेटांवरही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.