ट्विशा शर्मा प्रकरण सुप्रीम कोर्टात; मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी..
ट्विशा शर्मा प्रकरण सुप्रीम कोर्टात; मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी..
img
Nandini khandare More


महिलांचा होणारा कौटुंबिक छळाच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आले आहेत. दरम्यान काही दिवसांआधीच ट्विशा शर्मा  मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा देश हादरला आहे. आता या प्ररकणात एक महत्वपूर्ण टिप्पणी सुनावणी दरम्यान देण्यात आली आहे. देण्यात आली आहे.

देशभरात गाजत असलेल्या ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात कोर्टात नाराजी व्यक्त करण्यात आली. ट्विशा शर्मा हिच्या मृत्यूनंतर गंभीर आरोप केले जात आहेत. ट्विशा शर्मा हिचे कुटुंब गंभीर आरोप करत असतानाच तिच्या चारित्र्याबद्दल धक्कादायक विधाने सासरच्या मंडळींकडून करण्यात येत आहेत. लग्नाला 5 महिने पूर्ण होताच ट्विशा शर्मा हिचा संशयास्पद मृत्यू झाला, ज्यानंतर कुटुंबियांनी गंभीर आरोप केली. 

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी भोपाळमधील ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणावर एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. 25 मे 2026 सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान महत्वाची टिप्पणी करण्यात आली. ही टीप्पणी फक्त एका ट्विशा शर्मा प्रकरणात नाही तर देशातील सर्व पालकांकरिता आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी..

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ट्विशा शर्मा हिच्या कुटुंबीयांवर नाराजी व्यक्त केली. याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, त्यांनी आपल्या मुलीच्या तक्रारीवर वेळीच लक्ष देणे आवश्यक होते. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचौली यांच्या खंडपीठासमोर मध्य प्रदेश सरकारकडून एसजी तुषार मेहता हजर झाले होते.

इतर बातम्या
मोठी बातमी :

Join Whatsapp Group