उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदाराला पहिला मोठा झटका !
उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदाराला पहिला मोठा झटका !
img
Nandini khandare More

राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे. 6 खासदार हे ठाकरे गटातून फुटले आहेत. ते वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटातून जे खासदार फुटले आहेत, त्यांच्यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील समावेश आहे. त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता या सर्व प्रकरणावर नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कृष्णा पाटील आष्टीकर यांनी या सर्व प्रकरणावर घेतलेली भूमिका ही नागेश पाटील आष्टीकर यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे कृष्णा पाटील आष्टीकर हे नांदेड विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.

मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, आघाडीचा होतो आणि आघाडीचाच राहणार आहे. कुठली तरी बातमी आली आणि माझ्यावर शंका उपस्थित केली जात आहे. मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. हा पळून जाणार गडी नसून मैदान मारणारा गडी आहे.  समोरच्यांना आवाहन पेलावत नसल्याने संभ्रम पसरविला जातो आहे. भूलथाप्पांना बळी पडू नका, अशी आपली भूमिका यावेळी कृष्णा पाटील आष्टीकर यांनी जाहीर केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group