1 जूनपासून विमान कंपन्यांचा ''हा'' मोठा निर्णय
1 जूनपासून विमान कंपन्यांचा ''हा'' मोठा निर्णय
img
Nandini khandare More

भारतातील दोन सर्वात मोठ्या विमान कंपन्या अर्थात इंडिगो आणि एअर इंडिया या कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. म्हणून आता तुम्हीही विमानाने कुठे प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही महत्वाची बातमी तुमचाच साठी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो आणि एअर इंडिया या कंपन्या 1 जून 2026 पासून मोठा निर्णय घेत आहेत. 1 जूनपासून पुढे तीन महिन्यांकरिता त्यांच्या देशांतर्गत विमानसेवा मोठ्या प्रमाणात कमी करत आहेत. विमानांमध्ये कपात करत आहेत. देशांतर्गत मार्गांवरील विमानांची संख्या कमी केल्याने आता विमान तिकिटात मोठी वाढ होऊ शकते. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे विमान कंपन्यांनी आधीच तिकिटांचे दर वाढवले ​​आहेत. त्यामध्येच आता विमानांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला.

एअर इंडिया आपल्या देशांतर्गत विमानसेवांमध्ये अंदाजे 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेत आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोकडूनही आपल्या देशांतर्गत सेवेत 7 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. शाळेला सुट्ट्या लागल्या असून पालक मुलांसह बाहेर फिरण्याकरिता जात असतानाच हा निर्णय विमान कंपन्यांकडून घेण्यात आला.

उड्डाणे कमी करण्याचा हा कल आधीच सुरू झाला आहे. भारतातील चार सर्वात मोठ्या विमान कंपन्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये अंदाजे 6 टक्के कमी उड्डाणे केली. इंडिगोने आपल्या उड्डाणांमध्ये4.5 टक्के आणि एअर इंडियाने 7.5 टक्के कपात केली. एअर इंडिया एक्सप्रेसने याच कालावधीत 17 कमी उड्डाणे केली. एका मागून एक कंपन्या याबाबत निर्णय घेत आहेत. इंधन दरवाढ आणि इंधनाचा तुटवडा यादरम्यानच विमान कंपन्यांकडून हे निर्णय घेतली जात आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group