बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित ‘‘राजा शिवाजी’ सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘राजा शिवाजी’ या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत मोठा इतिहास रचला आहे. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. याचा अर्थ असा की, ज्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहात पाहिला नाही, ते आता घरबसल्या याचा आनंद घेऊ शकतील. ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा 26 जून, शुक्रवारी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, या प्लॅटफॉर्मकडून अद्याप कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सिनेमाच्या बजेटबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, सिनेमाने 100 कोटींमध्ये तयार झाला आहे… तर सिनेमाची कमाई 130 कोटी आहे… मराठी सिनेविश्वात 100 कोटींचा गल्ला पार करणारा ‘राजा शिवजी’ सिनेमा पहिला सिनेमा ठरला आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर मराठी सिनेमाचे चांगले दिवस आले.. असं म्हणायला हरकत नाही.